सोलापूर : जुळे सोलापूर येथील डी मार्ट परिसरातील अतिक्रमणांविरोधात सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. या मोहिमेत ११ लोखंडी चारचाकी हातगाड्या, एक लाकडी चारचाकी गाडी, दोन लोखंडी टेबल, एक लोखंडी काउंटर, एक बोर्ड आणि दोन लोखंडी खोके जप्त करण्यात आले. तसेच दोन खोके निष्कासित करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार महापालिकेचे अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागप्रमुख सोपान कांबळे, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे आणि राजकुमार कावळे यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
शहरातील प्रमुख व्यापारी परिसर आणि वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जात आहे. डी मार्ट परिसरातील या मोहिमेत हातगाड्या आणि अन्य साहित्य जप्त करून अतिक्रमण हटविण्यात आले.
—
Post Views: 12