सांगोला – पाकणी (ता.उत्तर सोलापूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही संघांची संगमनेर (जि.अ.नगर) येथे होणाऱ्या आगामी विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. या यशस्वी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे खजिनदार शंकरराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक शुभांगी घोंगडे, मकरंद अंकलगी उपस्थित होते. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा.संतोष लवटे, सुनील भोरे, प्रा.डी.के.पाटील, नरेंद्र होनराव, सुभाष निंबाळकर, प्रा.सचिन चव्हाण, स्नेहल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ऍड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, पर्यवेक्षक काकासो नरूटे यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत संगमनेर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 42