बार्शी – क्रीडा युवक संचलनालय पूणे व धाराशिव जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा १७ ऑक्टोबर रोजी धाराशिव येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत बार्शीच्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शी व ज्ञानद्योग उच्च माध्यमिक विद्यालय येरमाळा चा विद्यार्थी पृथ्वीराज गणेश रोडे याने दमदार कामगिरी करत १७ वर्षांखालील वयोगटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत गोल्ड मेडल पटकावलं.
पृथ्वीराज ने स्पर्धेदरम्यान आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. त्याच्या या सातत्यपूर्ण सरावाचे आणि मेहनतीचे फळ म्हणून त्याची पूढील होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
पृथ्वीराज ला संस्थेचे अध्यक्ष – भगवान जाधव सर, उपाध्यक्ष – गणेश रोडे सर, सचिव- सौ. सविता जाधव मॅडम, सौ.स्नेहल रोडे मॅडम, प्राचार्य – श्री. डी.बी.मोरे, क्रीडा शिक्षक – बापूराव चांदणे सर, संदिप पेचगुडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेच्या व प्रशिक्षक यांच्या वतीने – संचिती जाधव, अतुल जाधव सर, विश्वजीत जाधव, आदित्य माळी, यश नान्नजकर, उमेश चव्हाण सर, रितेश जानराव सर , यशराज रोडे या सर्व प्रशिक्षकांनी व पालकांनी पृथ्वीराज चे अभिनंदन केले व पुढील त्यास विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.