सोलापूर – शहर पातळीवर शालेय क्रॉस कंट्री स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात कुमठे प्रशालेच्या नेहा जाधव व मुलांच्या गटात जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या साईश्वर गुंटूक याने प्रथम क्रमांक पटकाविला.
नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रिकेट संघटनेचे व्हॉइस चेअरमन श्रीकांत मोरे यांनी केले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख, सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव व सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे श्रीरंग खांडेकर, सूर्याजी लिंगडे, प्रकाश गायकवाड, सुनील चव्हाण, बसवराज परीट, एकनाथ पवार, प्रा,प्रमोद चुंगे, प्रा. गायकवाड, प्रा राहुल हजारे, सचिन गायकवाड, सुभाष उपासे, मारुती घोडके, विक्रम पवार, पुंडलिक खालकामकर, प्रा. विभुते, प्रा. संतोष खेंडे , प्रथमेश हिरापुरे, शिवानंद सुतार इत्यादी प्रमुख आणि पंच म्हणून काम पाहिले.
अंतिम प्रथम सहा खेळाडू, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव : मुले : साईश्वर गुंटुक, अभिनव खाडे ( सेंट थॉमस), सिताराम गायकवाड ( हरीभाई देवकरण), मंथन धनश्री (संगमेश्वर), मुरलीधर दिकोंडा ( जय जवान जय किसान), दीपक इपोळे (छत्रपती शिवाजी).
मुली : नेहा जाधव, अक्षरा पवार (कुमठे प्रशाला), सृष्टी हडपद, अक्षदा गंगोडा ( छत्रपती शिवाजी), साक्षी जाधव (कुमठे प्रशाला), नंदिनी बंडगर (छत्रपती शिवाजी).
—–




















