वैराग – वैराग येथील कासार गल्ली स्थित ‘केसरी शक्ती नवरात्र महोत्सव मंडळ’ यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत १५१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
यावर्षी केसरी शक्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे रौप्य महोत्सवी (२५ वे) वर्ष असून, मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
या भव्य रक्तदान शिबिराचे नियोजन व ते यशस्वी करण्यासाठी मंडळाचे बाळासाहेब कासार, महेश कासार, प्रशांत दिक्षित, प्रकाश कासार, नितीन रणदिवे, अरुण साखरे, मनोज दिक्षित, धनंजय माने, सचिन रणदिवे, सचिन कासार, बालाजी गवळी, सुधीर मस्के, सर्व्हेष कासार, सोहम रणदिवे, पिऊष कासार, प्रितम रणदिवे, श्लोक कासार व कैवल्य कासार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी रामभाई शहा रक्तपेढी, बार्शी यांचे मोलाचे तांत्रिक सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वितेबद्दल सर्व रक्तदात्यांचे व ग्रामस्थांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
Post Views: 10