सोलापूर : नूमवि शिशु शाळेत मुख्याध्यापिका अर्चनाताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव उत्साहात साजरा झाला. यामध्ये घटस्थापनेबद्दल माहिती देऊन शक्ती उपासनेचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
भूपाली व जास्वंद गटाने तुळजाभवानीकडून शिवरायांना तलवार प्रदान, बागेश्री व निशिगंध गटाने पृथ्वी प्रदक्षिणा व मातृ-पितृ भक्तीचा संदेश, रागेश्री गटाने भाज्यांच्या सजावटीसह बनशंकरी देवी, सारंग गटाने सरस्वती रूप व नर्सरी गटाने सरस्वती प्रार्थना, तर केदार गटाने अष्टभुजा देवीचा राक्षसवध देखावा सादर करून दुष्टशक्तीवर विजयाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
उत्सव यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी, सांस्कृतिक प्रमुख अलका ओक, मृणाल देशपांडे, स्नेहा गजेंद्रगडकर, सारिका कुलकर्णी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर वृंदांनी परिश्रम घेतले.




















