विजयादशमीनिमित्त आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौड
तभा वृत्तसेवा
सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे मंगळवारी विजयादशमी निमित्त श्री दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी ६.३० वाजता सोलापूर बसस्थानक येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून या दौडीस प्रारंभ होईल.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दररोज श्री दुर्गामाता दौड काढण्यात येते. सोलापूर शहरात यंदाच्यावर्षी सात भागांतून दररोज ही श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. या सर्व दौडींचा समारोप विजयादशमी दिवशी होणार आहे.
सोलापूर शहरातील हिंदू बांधवांनी मंगळवारी होणाऱ्या श्री दुर्गामाता दौडीत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे करण्यात आले आहे.





















