पिलीव – मंडलामधये यंदा सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे चाऱ्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. पिलीव गावातील पश्चिम भाग, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी या सर्व गावामध्ये पिण्याचे पाण्याचे संकट तसेच चाऱ्याचे गडद संकट निर्माण झाले आहे.1972 च्या दुषकाळापेक्षा ही दुष्काळाची यंदा दाहकता प्रचंड आहे. कारण पुर्ण खरीप हंगामच वाया गेल्यामुळे अन्न धान्य, पिण्याचे पाणी, चारा याची मोठी टंचाई सध्या जाणवत आहे. भिषण दुषकाळी परिस्थिती कारण ऑक्टोबर महिन्यातच पाणी, चारा याची तिव्र टंचाई जाणवत आहे. शासनापुढे चारा, पाणी ,अन्न धान्य व हाताला काम देणयाचे मोठे आव्हान आहे. जवळपास आतापासूनच पुढील आठ महिन्यापर्यंत शासनाला दुष्काळाचे नियोजन करावे लागणार आहे. शासन चाऱ्याचा निर्णय काय घेते याकडे लक्ष लागले आहे कारण चारा छावणी की चारा डेपो परंतू यामध्ये पारदर्शकता पाळणे फार मोठा अनुभव शासनाला आला आहे. चारा छावणी सुरु करायची म्हटले तर पाणयाची सोय, चाऱ्याची सोय, पशुखाद्य, डाॅकटरची सोय करणे आवश्यक आहेच पण चारा छावणी मध्ये संसर्गजन्य रोगाची भिती जास्त आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता चारा छावणीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्याकाळी चारा छावण्या दोन तीन महिने होत्या पण यंदाच्या चारा छावण्या सहा _ सात महिने सुरु ठेवाव्या लागणार आहेत. यामुळे शासनाने चारा छावण्या कींवा चारा डेपो न करता चाऱ्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. पण यामध्ये पशुगणना करणे आवश्यक आहे. शासनाने यासाठी पशुगणना ही तंतोतंत पाहीजे. शासनाने पशुपालक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत जमा करावी अशी मागणी पशुपालकामधुन होत आहे. माञ शासन नक्की काय निर्णय घेते याकडे सध्या पशुपालकांचे लक्ष लागले आहे. परंतु सध्या पिलीव परिसरातील शेतकऱ्यांमधुन चाऱ्याची मागणी होत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















