सोलापूर : सोलापूर शहरातील नामांकित नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट तांत्रिक खेळ, अष्टपैलू कामगिरी आणि जिद्दीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्धी संघांना टक्कर देत कांस्यपदकाला गवसणी घातली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत सोमपा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने आयोजित शालेय फुटबॉल स्पर्धेत ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सांघिक समन्वय, खेळातील कौशल्य आणि जिंकण्याची जिद्द दाखवत तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार करजगी, संस्थेच्या सचिव वर्षा विभुते, स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, स्कूलच्या मार्गदर्शिका मीना पारखे आणि प्राचार्या रश्मी कुंभार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा विभागप्रमुख आनंद लिगाडे आणि ज्ञानदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
—
Post Views: 5