बार्शी – यंदाच्या पावसाळ्यात बार्शी तालुक्याला पावसाने अक्षरशः हुलकावणी दिल्याने त्याचा थेट परिणाम जलसाठ्यांवर झाला आहे. तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने पावसाळा संपताच बहुतांश लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच तालुक्याच्या पाणी प्रश्नाची चिंता वाढली असून, आगामी तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.
ऑक्टोबर जलसाठा नोंदीनुसार, हिंगणी प्रकल्पात अवघा १३.५४ एमसीएफटी पाणीसाठा असून उपयुक्त
साठ्याची टक्केवारी शून्य नोंदविण्यात आली आहे. जळगाव प्रकल्पात १०.८३० एमसीएफटी म्हणजे १७.४७ टक्के पाणीसाठा आहे. पिंपळगाव प्रकल्पाची स्थिती त्याहून गंभीर असून तेथे केवळ ०.९७ एमसीएफटी पाणी शिल्लक आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील अनेक प्रकल्पांची पाणीपातळी चिंताजनक टप्प्यावर पोहोचली आहे. बाभूळगांव, चारे, गोरमाळे, कळंबवाडी, कारी, काटेगाव, ममदापूर, शेळगांव (आर) आणि वालवड या प्रकल्पांची नोंद बीएसएल-नील अवस्थेत आहे. म्हणजेच या ठिकाणी उपलब्ध साठा तळ पातळीपेक्षाही खाली गेल्याचे चित्र आहे. परिणामी संबंधित गावांमध्ये भविष्यातील पाणी पुरवठ्याबाबतची चिंता अधिक गडद झाली आहे.
दरम्यान, काही प्रकल्पांमध्ये पाण्याचा अत्यल्प साठा उरला आहे. कोरेगाव येथे १२.८९ टक्के, पाथरी येथे ११.३६
टक्के तर वैराग येथे केवळ ३.६१ टक्के साठा उपलब्ध आहे. तावडी प्रकल्पातही पाणीसाठा नसल्याची नोंद आहे. याशिवाय केटीवेअरमधील भोईर, देगाव, डिकसळ, घाणेगाव, इरळे आणि तडवळे येथील साठाही नील असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
आतापासूनच जल नियोजनाची गरज
सध्याची जलसाठ्यांची स्थिती पाहता संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य, टंचाईग्रस्त गावांची पूर्वनियोजित यादी तसेच पर्यायी पाणी स्रोतांची उपलब्धता याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाळा संपला असला तरी बार्शी तालुक्याची पाण्याची चिंता मात्र आता सुरू झाली आहे. आगामी नऊ महिने आणि वाढत्या उन्हाचा कालावधी लक्षात घेता वेळेत प्रभावी जल नियोजन झाले नाही, तर यंदाचा उन्हाळा बार्शी तालुक्यासाठी मोठ्या पाणी टंचाईची परीक्षा