सोलापूर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्यद्वारा आयोजित अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने अहिल्यानगर येथील नेवासा येथे झालेल्या पुणे विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने विजेतेपद पटकविले. या कामगिरीवर संघाची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरावर क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली.
या विभागीय स्पर्धेत आपल्या सोलापूरच्या संघाने पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड व अंतिम सामना अहमदनगर ग्रामीण यांच्यासोबत होऊन विजेतेपद पटकाविले. संघास क्रीडा शिक्षक माणिक साळसकर , प्रमोद चुंगे, अक्षय गवळी मार्गदर्शक प्रकाश कंपली यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे शिक्षण प्रसारक मंडळी पुणे नियामक मंडळाचे सदस्य अनिल बरवे, तुषार कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्ष सुरेशबाबु मंकणी, प्राचार्य प्रकाश कांबळे, व्ही.एम.मेहता शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी, तसेच महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी संघास अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
विजेता संघ : विभावरी देवकते, आर्या उमाप, स्नेहा शिंदे, माही राठोड, प्रतीक्षा नंदर्गी, समृद्धी चटे, तनिष्का गुर्रम, श्रुती चन्ना, आस्था रघुवंशी, वैष्णवी पडणूरे, धानेश्वरी घोंगडे, अनुष्का देशमुख, सना शेख, हर्षदा व्हनमाने, आदिती गोरे, स्मृति तोरणे.
—-




















