सोलापूर – जयपूर ( राजस्थान) येथे झालेल्या ज्युनिअर 21 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत रिकर्व प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सांघिक गटात सुवर्ण पदक प्राप्त केले. या संघात येथील धनुर्धर आर्चरी अकॅडमीच्या राजनंदिनी वाघमारे हिचा समावेश आहे. राजनंदिनीची ही पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा होती व पहिल्याच स्पर्धेत तिने सुवर्ण पदकांची कमाई केली. तिला प्रशिक्षक दिपक चिकणे यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, मुख्य कार्यकारी जिल्हा क्रीडा अधिकारी दत्ता वरकड, जिल्हा संघटनेचे सचिव प्रा.हरिदास रणदिवे यांनी अभिनंदन केले.
—-





















