मंगळवेढा – एकीकडे शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असताना दुसरीकडे भीमा नदीच्या कोरड्या पात्रात वाळू तस्करांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. नदी पात्रात जेसीबी घालून रस्ते तयार केले जात आहेत आणि रात्रभर टिप्परच्या टिप्पर वाळू पळवली जात आहे.
*कसा चालतो गोरखधंदा?*
स्थानिकांच्या सांगण्यानुसार हा धंदा अगदी ‘सिस्टीम’ लावून चालतो. दिवसा पेट्रोल पंपावर टिप्पर लावून ठेवायचे, रात्री वाळू तस्कराचा फोन आला की नंबरनुसार नदीपात्रात जायचे आणि भरून पसार व्हायचे. हा सगळा काळा बाजार संबंधित गावच्या तलाठ्यांना मॅनेज करून सुरू असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत.
तक्रार करायला गेल्यावर तलाठीच म्हणतो – “हे आमचं काम नाही, पोलीसांचं काम आहे!” महसूलचा हा अजब तर्क ऐकून नागरिकही हतबल झाले आहेत.
फोटोमध्ये दिसत असलेले वाळूचे अवाढव्य ढिगारे हेच त्या बेकायदेशीर धंद्याचे पुरावे आहेत. नदीत मोठमोठे खड्डे पडल्याने भविष्यात पाणीच टिकणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
*जिल्हाधिकारी लक्ष देणार का?*
काळे सोने लुटले जात असताना महसूल यंत्रणा मूग गिळून गप्प का? याच्यावर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पंचनामे करून संबंधित तलाठी आणि वाळू तस्करांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी नदीकाठच्या गावांमधून होत आहे.
चौकट
पंढरपुरातील दहा वाळू तस्कर तडीपार एस पी अतुल कुलकर्णी यांची बेधडक कारवाई
मंगळवेढ्यातील वाळू तस्करावर कारवाई कधी होणार नागरिकांचा सवाल
Post Views: 11