सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ अंतर्गत सोलापूर झोनल स्पोर्ट्स कौन्सिलने आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेत एन. के. ऑर्किड महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले.
महाविद्यालयाच्या टर्फ फुटबॉल कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत एन. के. ऑर्किड महाविद्यालयाने ए. जी. पाटील महाविद्यालयाचा ३-० असा पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी एम.जी.एम. नांदेडवर १-० ने विजय मिळविला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास मेतन यांच्या हस्ते आणि सोलापूर झोनलचे सचिव प्रा. सचिन गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य प्रा. एस. के. जामदार, प्रा. शिवशरण कोरे, प्रा. मनोज राठोड, प्रा. ऋचा श्रीराम, विद्यार्थी क्रीडा सचिव प्रतीक डांगे, सौरभ पांढरभिसे, श्रेया पुल्ली आदी उपस्थित होते.
—–






















