अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल नंदिनी महिला बचत गटाच्या कार्यालयात बँकेचे व्यवस्थापक अजित किवडे, तसेच तालुका उमेदचे तालुका समन्वयक अतुल क्षीरसागर व इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उमेदच्या मंद्रूप-क्रांती प्रभागाच्या अध्यक्षा अंजुम शेख, वर्षा भडकुंबे, सुरेखा व्यवहारे, सपना लोभे, उषा कुंभार, अश्विनी बिराजदार, वडकबाळच्या नंदिनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा उमा बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बचत गटाच्या सचिव शालन पुजारी, मुक्ताबाई लिगाडे, सनागुबाई बिराजदार, जगदेवी बिराजदार, वैशाली पुजारी, स्नेहा बिराजदार, महानंदा बिराजदार, प्रभावती बिराजदार आदी सदस्य उपस्थित होत्या.






















