सोलापूर : मलकापूर (बुलढाणा) येथे झालेल्या १४ वर्षाखालील राज्य शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत समाज कल्याण लॉन टेनिस क्लबचा खेळाडू कु. ऋषिकेश चव्हाण याने शालेय राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत ऋषिकेशने सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले असून वैयक्तिक गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याची महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल समाज कल्याण लॉन टेनिस क्लबचे श्री संगमनाथ नागोजी सर तसेच प्रशिक्षक सुधीर सालगुडे आणि पूजा सालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वीरगौड आणि शिवा हडपद अभिनंदन केले. मार्गदर्शक शिवाजी वासपटे यांचे मार्गदर्शन लाभले त्याच्या पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.
Post Views: 11