पंढरपूर – पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय बरोबरच मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित कामाबाबत आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळला असून लवकरच काम मार्गी लागेल असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयासह मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित कामांबाबत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून रुग्णालयांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याची मागणी केली.
सर्वसामान्य नागरिकांना मतदारसंघातच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, रुग्णांना उपचारांसाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी या रुग्णालयांची कामे पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. याबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.
Post Views: 7