पंढरपूर – दक्षिणेची काशी अर्थात पंढरी नगरीत सोमवारी (दि.२६) महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार मंडळींची भव्य असे वारकरी महाशिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या महाअधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे एक हजाराहून अधिक संत मंडळी उपस्थित राहिली होती. वारकरी सांप्रदायिक पाईक संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी यांनी आपल्या अनुलोम परिवारातर्फे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्या बाबत कळविले होते
संत मंडळींची सेवा करण्याची संधी मिळणार असल्याने वरिष्ठांनी देखील त्वरित संमती दिली.या शिबिरासाठी सी.एम.आर.एफ. (C.M.R.F.) चे सोलापूर जिल्हा प्रमुख डॉ.अविनाश खांडेकर, डॉ.एकनाथ बोधले ,डॉ.सरडे आणि डॉ.दिग्विजय केंदुळे यांनी ही तात्काळ संमती दिल्याने हे शिबिर यशस्वी पार पडले
दरम्यान या शिबिरात १०३ महाराज मंडळींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी स्थानिक पातळीवर काम करणारी डॉक्टर,सिस्टर, आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले,तसेच अनुलोमचे पंढरपूर भाग जनसेवक रामेश्वर कोरे,अनुलोम मित्र किरण सर्वगोड,योगेंद्र आंधळकर ,सतीश लिगाडे यांनी ही सहभाग घेतला होता.
Post Views: 7