ज्ञानधर सुमंत यांचे Saty श्रीपूर येथिल दि . बृहन्महाराष्ट्र शुगर ची मारुती मंदीराची वडिलां पासून सेवा करणेची जबाबदारी आहे .
गेल्या अनेक वर्षा पासून हे कुटूंब निरपेक्ष पणे ही सेवा बजावत आहेत .
या माध्यमातूनच या ठीकाणी हनुमान भजनी मंडळाची स्थापना झाली . मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात ज्ञानेश्वरी पारायण , हनुमान जयंती , कृष्णजन्माष्टमी , रामनवमी , या धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून भजन ,किर्तन सेवा होतात .
त्यामुळे ज्ञानेश्वर सुमंत यांना या उत्सवाच्या माध्यमातून भजन , किर्तनाची कला अवगत झाली .
आज अनेक ठीकाणी त्यांना किर्तन सेवे साठी आमंत्रित केले जाते त्यांच्या या गुणांचा दखल घेवून त्यांची निरपेक्ष किर्तन सेवेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली . त्याच्या या निवडीमुळे श्रीपूर मध्ये त्यांचा सत्कार जेष्ठ नागरिक दगडूतात्या मोरे , हरीभाऊ जाधव , भाऊसाहेब कुलकर्णी , भरत देव (जोशी ) यांचे हस्ते करण्यात आला . याप्रसंगी पांडुरंग कारखान्याचे अधिकारी सुभाष बागल , आत्माराम गोफणे , सुरेश पुराणिक गजानन मोकाशी , मंगेश पवार , अभय परांडकर , मिलिंद कुलकर्णी , ब्रिमा सागर डिस्टलरीचे धनंजय कुलकर्णी , विशाल जाधव , अमोल पाठक , चैतन्य थत्ते , तुकराम सुमंत , तानाजी जमदाडे उपस्थित होते .





















