अक्कलकोट – लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या राज्यातील नाराज ८५ लाख महिलाना ई के वाय सी करण्यासाठी पुन्हा एकदा तीन महिन्याची मुदत वाढ द्यावेत आणि या योजनेतूनच त्यांचं वय ६५ वरून ८० पर्यंत वाढवावे* अश्या मागणीचे लेखी निवेदन *जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर यांच्या मार्फत मंत्री अदिती तटकरे यांच्या कडे अश्याच मागणीचे लेखी निवेदन स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने* दिले आहे.
*लाडकी बहीण योजनेतील २ कोटी ४६ लाख महिलापैकी १ कोटी ४६ लाख महिलांना दर महिन्यास १५००/ रुपयांचा आर्थिक मदत मिळत आहे*. *८१ लाख महिलांचे नावे या योजनेतून काही कारणाने वगळली आहेत, तसेच अजून ही जवळपास ४ ते ५ लाख महिला या योजनेपासून कोसो दूर आहेत असे समजते. अश्या सर्व ८५ लाख महिलाना या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा ई के वाय सी च विंडो सुरू करून त्या सर्वांना आर्थिक लाभ मिळवून द्यावेत* असे मुख्यमंत्री आणि महिला व बाल कल्याण विकास मंत्री यांच्या कडे मागणी केली आहे.
*स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक जी कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश जी शेवाळे, विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात यांच्या आदेशानुसार व विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश काशिकर यांचे मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांच्या कुशल नेतृत्वाखाली जनहितार्थ निवेदन शासनास सादर केले आहेत.*
*या प्रसंगी विश्वस्त उमेश काशिकर, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, जिल्हा प्रभारी अमर शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक कुरुलकर, जिल्हा सचिव सुधाकर शहाणे, अक्कलकोट शहर अध्यक्षा श्रीमती मीराबाई बुद्रुक, उपाध्यक्ष हर्षद पंडीत, जिल्हा सरचिटणीस दत्तगुरु वेदपाठक, सो. जिल्हा कार्य. सदस्य दिलीप क्षीरसागर, संतोष पोतदार, मल्लिनाथ जमादार आदी पदाधिकारी उपस्थित होते.*
Post Views: 22