सोलापूर – रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या शालेय शहर नेटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात बेगम कमरुन्निसा कारीगर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने विजेतेपद तर 14 वर्षाखालील मुलींनी उपविजेतेपद पटकावले. या संघास क्रीडा शिक्षिका सईदा दारूवाले, अनिसा नालबंद, वसीम बागवान व मोईम सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्राचार्या तहसीना शेख व आरिफ पठाण आदींनी कौतुक केले.
विजयी 19 वर्षाखालील संघ : हाजरा शेख, हादिया मुल्ला, अक्सा पठाण , तहरीम पठाण, ईनाया बागवान, शमीम शेख, आयशा शेख, वीबी आयशा मोहोळकर, अरशा शिकलकर , महेक बागवान, आयसा मुल्ला.
उपविजयी १४ वर्षाखालील संघ : हुमेरा तारकश, अंजनला नाडेवाले, सायमा पठाण , हिदाया शेख, हायफा शेख, सना पठाण, सिमरा काझी, जवेरीया पठाण, आलीना शेख , खदिजा खान, बीबी आशिया चौधरी.
—-






















