सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील आधुनिक संशोधन केले. या त्यांच्या संशोधनाचा सन्मान भारत सरकारच्या पेटंट ऑफिस, नवी दिल्ली यांनी केला असून या संशोधनाचे पेटंट त्यांना बहाल केले आहे. डॉ.प्रा.सुनयना माळी, डॉ.प्रा.औदुंबर माळी, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील तसेच विद्यार्थिनी प्राची पाटील, शीतल खरात, कोमल पाटील, प्रणाली भिसे, श्रेया नवले, ऋतुजा विभुते, पियुशा गोरे, निकिता रणदिवे यांनी न्यूट्रा सुटीकल टॅबलेट, हर्बल ओइन्टमेन्ट, हर्बल टूथ पॉवडर, पॉली हर्बल अँटी एजिंग क्रीम या विषयावर चार पेटंट प्रकाशित केले. या यशाबद्दल संस्थाध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.