Tuesday, February 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘मेरी माटी, मेरा देश’; होणार सन्मान शूरवीरांचा …

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2023
in maharashtra
0
‘मेरी माटी, मेरा देश’; होणार सन्मान शूरवीरांचा …
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहिम देशभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची ही संक्षिप्त माहिती…

भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. ग्रामस्तरापासून राष्ट्रीयस्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामपंचायतींमध्ये शहिदांचे नाव असणारे शिलाफलक बसवण्यात येणार आहेत. दिल्ली येथे निर्मित होणाऱ्या अमृत वाटिकेसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून माती आणली जाणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांना नमन करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रम आयोजिले आहे. शूरविरांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्ह्यातील 87 अमृत सरोवराजवळ शिलाफलक उभारले जातील. तसेच अमृत सरोवराच्या परिसरात प्रत्येकी 75 याप्रमाणे 6 हजार 525 भारतीय प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

‘मेरी माटी, मेरा देश ‘ हा भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम राहणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, शहिद झालेल्या जवानांचे कुटुंबिय आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहे. गेल्या वर्षी ‘हर घर तिरंगा’ या देशव्यापी अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समरोपाला ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिम राबविण्यात येणार आहे.

शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे, मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे ‘मेरी माटी, मेरा देश’ या मोहिमेचे प्रमुख घटक राहणार आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

या मोहिमेमध्ये आपल्या शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित शिलाफलकांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच पंच प्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहे. वीरहृदयांची गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन करणारे शिलाफलक, स्मारक फलक हे शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या-त्या भागातील शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावाबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल. ही मोहीम १२ मार्च २०२१ रोजी सुरू झालेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा समारोप राहणार आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतभरात दोन लाखाहून अधिक कार्यक्रम घेण्यात आले आहे. देशभरातील जनतेने यात व्यापक लोकसहभाग नोंदवला. दि. ९ ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गटस्तरावर, तसेच स्थानिक स्वराज संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे.

दिल्ली येथे ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामस्तरावरून पंचायत स्तवरावर माती गोळा करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन जिल्हास्तरावर एकत्रित केल्या जाईल. त्यानंतर शहिदांच्या कुटुंबियांच्या हस्ते दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमासाठी अमृत कलश रवाना करण्यात येणार आहे. ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असेल.

या मोहिमेत लोकसहभागाला विशेष महत्व देण्यात आले आहे. लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कृतीतून लोक भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रति आदर व्यक्त करणे, यावर लक्ष केंद्रित करून पंच प्राणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतात. अशा प्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. गेल्या वर्षीच्या सहभागामुळे ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी झाला. या वर्षी देखील दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवावेत आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या देशव्यापी मोहिमेचा तपशील yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर उपलब्ध राहणार आहे. पोर्टलवर ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेतील विविध उपक्रमांची संबंधित माहिती देण्यात आली आहे. तरूणांनी या वेबसाइटवर सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रम अपलोड करून या पोर्टलद्वारे मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. युवक-युवतींनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी व्हावे, तसेच आपल्या शूरवीरांना आणि आपल्या मातृभूमीला आदरांजली वाहण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘मेरी माटी, मेरा देश’ मोहीम दि. 9 ऑगस्ट रोजी सुरू होईल. दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर दि. १६ ऑगस्ट २०२३ पासून गट, नगरपालिका, नगरपरिषद आणि राज्यस्तरावर होणार आहेत. दि. ३० ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे समारोप होणार आहे.

Post Views: 104
Previous Post

पुण्यात अजित पवारांना पाहून काय म्हणाले अमित शहा ?

Next Post

मेक्सिकोतील राज्य महाराष्ट्राशी व्यापार व शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास इच्छूक : आलेहान्द्रो

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मेक्सिकोतील राज्य महाराष्ट्राशी व्यापार व शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास इच्छूक : आलेहान्द्रो

मेक्सिकोतील राज्य महाराष्ट्राशी व्यापार व शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास इच्छूक : आलेहान्द्रो

ताज्या बातम्या

प्राचार्यांकडून झालेला अपमान जिव्हारी 19 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या. #college #foryou #vairal

February 17, 2026

पंढरपूर नगरपालिकेचा नवा उपक्रम…#pandhrpur

February 17, 2026

दोन दिवसाआड पाणीपुरवठा अशक्य..#solapurnews #solapur #पाणी

February 17, 2026

सोने चांदीच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच.#gold #jewellery

February 17, 2026

संगमनेर मध्ये 14 कत्तलखाने जमीन उध्वस्त.#public #marathinews

February 17, 2026

२३ वर्षीय तरुणाने प्रेम संबंधातून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून केली आत्महत्या.#public

February 17, 2026

महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठलाची पूजा संपन्न

February 17, 2026

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ट्रेनिंग प्रोग्रॅम 

February 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0684334

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697