पंढरपूर – सहकार शिरोमणी कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे मागील गळीतास आलेल्या ऊसास रु.१००/- चा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मागील सिझनमध्ये जिल्हयात सर्वाधिक दर दिलेला असून, चालु गळीत हंगामात जिल्ह्यातील इतर कारखान्याचे बरोबरोबरीने ऊस दर देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी जाहीर केले.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कल्याणराव काळे
यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन काळे यांनी सांगितले कारखान्याचे सभासद व मागील गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिपावली सणानिमित्त् कुपनाव्दारे कारखाना कार्यस्थळावर आणि पंढरपूर येथे साखर वाटप करण्याचे धोरण सहयोगी ओंकार शुगर कार्पोरेश याचेशी चर्चा करुन निश्चित करण्यात आले आहे.
गळीत हंगामाचे सुरुवातीपासून ते सन २०२३ अखेर ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे कारखान्याची थकित येणेबाकी आहे, अशा थकबाकीदारांच्या थकित रक्कमेवर २५ टक्के सवलत व संपुर्ण व्याज माफ करण्यात येणार असून, सर्व थकबाकीदारांनी दोन महिण्याच्या आत आपला ऊस गळीतास देवुन/ रोखीने थकित रक्कमा भरण्यात यावा व मुदतीत या सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच कामगारांनी आजअखेर प्रामाकिपणे केलेल्या कामाचा परिश्रमांचा विचार करुन सरसकट सर्व कामगारांना २० टक्के पगार वाढ करण्याची संचालक मंडळाने शिफारस केली असल्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले.
वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेतील सर्व विषयास व एनवेळीच्या विषयासही उपस्थित सर्व सभासदांनी अवाजी मताने मंजूरी देण्यात आली. विषयाचे वाचन प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे विद्यमान व्हा.चेअरमन तसेच आजी, माजी सर्व संचालक आणि सभासद,ऊस उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.
———————
चौकट : (कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न)
सहयोग ओंकार शुगर कार्पोरेशनच्या माध्यमातुन अहवाल सालात कारखान्याने विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाची व्याजासह एकूण ४७२०.१८ लाख परतफेड केलेली आहे. उर्वरीत कर्जही ओटीएस स्कीम अंतर्गत लवकरच भरणा करण्यात येणार आहोत. वैयक्तीक फायद्याचा विचार न करता सर्वाचे हित डोळ्यासमोर ठेवुन सहयोग तत्वावरील चालविणेचा निर्णय योग्य असून, लवकरात लवकर आपला कारखाना कर्ज मुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे चेअरमन काळे यांनी सांगितले.




















