सोलापूर – श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांची तहान भागविण्यासाठी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. भाविकांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमाचा प्रारंभ उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ कोळी, संस्थापक सदस्य विजय शाबादी, अंबादास कोळी, अशोक भांजे, महेश घाडगे, महेश देवकर,. उमा देगीनाळ,. प्रीती उडानशिव,. वैशाली चव्हाण, रवि कोळी, विश्वनाथ आवटे, विश्वनाथ आमणे, गिरीश मंद्रूपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना प्रवासादरम्यान पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. भाविकांना मदत करण्याच्या या सेवाभावी उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव सागर पुकाळे यांनी केले, तर अध्यक्ष विश्वनाथ कोळी यांनी आभार मानले.





















