सोलापूर : भवानी पेठेतील जेमिनी मातेच्या मिरवणुकीत भक्ती, शिस्त आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. गेल्या ५५ वर्षांपासून सुरू असलेली मिरवणुकीची परंपरा यंदाही उत्साहात जपण्यात आली. ‘आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदो उदो’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.
माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मिरवणुकीचा प्रारंभ जेमिनी मातेच्या पूजनाने झाला. यावेळी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, नगरसेवक प्रथमेश कोठे, बिजू प्रधाने, अक्षय अंजीखाने, ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेविका उज्ज्वला दासरी, बाबुराव जमादार, शशी थोरात, सचिन मेत्रस, अप्पी जमादार आणि बिपिन पाटील उपस्थित होते.ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि देवीच्या जयघोषात भवानी पेठ व घोंगडे वस्ती परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांनीही लेझीम खेळत उत्साह वाढविला. सिद्धरामय्या पुराणीक, सायबण्णा मुडल, हणमंतु मंदकल, विजय साळुंखे, संजय होमकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी आणि भाविक सहभागी झाले. दरम्यान, श्री समर्थ मित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Post Views: 11