सांगोला – माहिती अधिकाराच्या अर्जाच्या विरोधात मुख्याधिकारी यांनी निर्णय दिला म्हणून अर्जदार याने सांगोला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना सोमवार दि.१९ ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत अधिक माहिती अशी, अर्जदार सुशांत सुभाष गावडे रा.चिंचोली रोड, सांगोला, ता.सांगोला याने दि.५ ऑगस्ट रोजी सांगोला नगरपरिषद येथे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या अंतर्गत हालचाल रजिस्टर बाबत माहिती मिळणेकामी लेखी अर्ज केला होता. त्या अर्जाची सुनावणी दि.१५ ऑक्टोबर रोजी होऊन त्याबाबतचा निर्णय त्याला लेखी पत्राने कळविला होता. दरम्यान सोमवार दि.१९ ऑक्टोबर रोजी सांगोला नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी सचिन दगडु पाडे हे नेहमी प्रमाणे सायंकाळी ५ वा. आपले कार्यालयात काम करीत असताना सुशांत गावडे याने मी दिलेल्या माहितीच्या अधिकाराच्या अर्जाच्या विरोधात तुमचे मुख्याधिकारी यांनी माझ्या विरोधात निर्णय दिलेला आहे असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला. तसेच शिवीगाळी करुन शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत सचिन पाडे यांनी सुशांत गावडे याचे विरुध्द सांगोला पोलिस ठाणे येथे तक्रार दिली आहे.
Post Views: 3