Wednesday, May 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कृषी अधिकारी संतोष कोयले यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
May 13, 2026
in editor
0
कृषी अधिकारी संतोष कोयले यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – तालुक्यात खरीप हंगामात कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बार्शी तालुक्यात सोयाबीन पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला असून, हा संपूर्ण बार्शी तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

बार्शी तालुक्यात खरीप हंगामात सर्व पिकाखालील एकूण क्षेत्र सुमारे १ लाख ५ हजार हेक्टर असून, त्यापैकी तब्बल ९० टक्के म्हणजे जवळपास ९१ हजार २२८ हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे. याशिवाय तूर, उडीद आणि मूग या पिकांचेही मोठे क्षेत्र तालुक्यात आहे. सध्या तालुक्यात सोयाबीनचे सरासरी उत्पादन प्रति एकरी ७ ते ८ क्विंटल इतके मिळत असले, तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे उत्पादन वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न कृषी विभागाने केला आहे.

विशेषतः रुंद सरी- वरंबा पद्धत (बीबीएफ) आणि टोकन पद्धतीने लागवड या तंत्रज्ञानांचा प्रभावी प्रचार व प्रसार करण्यात आला. पारंपरिक पेरणीच्या तुलनेत या पद्धतींमुळे प्रति एकरी ३ ते ४ क्विंटल उत्पादन वाढ निश्चित होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे.

टोकन पद्धतीमध्ये मजुरांची अडचण भासत असली तरी त्यावर उपाय म्हणून कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर टोकन यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले. या यंत्राच्या सहाय्याने एक मजूर एका दिवसात किमान दोन एकर क्षेत्रावर लागवड करु शकतो. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी प्रेरित करत कृषी विभागाने जवळपास १३ हजार हेक्टर क्षेत्रावर बीबीएफ व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करण्यास यश मिळवले. या प्रभावी कामगिरीची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांच्या नियोजनबद्ध व शेतकरी हिताच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सन्मान करताना बार्शी तालुक्यात कृषी विभागाने राबविलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. आधुनिक शेती तंत्रज्ञान गावागावांत पोहोचवून शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे संतोष कोयले यांचे कार्य इतर तालुक्यांसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

बार्शी तालुक्याच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या या कार्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी खरीप हंगामात अधिकाधिक शेतकरी बीबीएफ व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याकडे वळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post Views: 9
Previous Post

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी १४ मे पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन

Next Post

अवाजवी एमआरपी रद्द करून वस्तुंवर उत्पादन मूल्य छापा – ग्राहक पंचायतीची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अवाजवी एमआरपी रद्द करून वस्तुंवर उत्पादन मूल्य छापा – ग्राहक पंचायतीची मागणी

अवाजवी एमआरपी रद्द करून वस्तुंवर उत्पादन मूल्य छापा - ग्राहक पंचायतीची मागणी

ताज्या बातम्या

आजपासून वांगी येथे पीर महादेव यात्रा महोत्सवास प्रारंभ

आजपासून वांगी येथे पीर महादेव यात्रा महोत्सवास प्रारंभ

May 13, 2026
जिल्हा परिषदेत सोमवारी ‘नो व्हेईकल डे’; इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी लागणार वाहनांना ब्रेक

जिल्हा परिषदेत सोमवारी ‘नो व्हेईकल डे’; इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी लागणार वाहनांना ब्रेक

May 13, 2026
आ. रोहित पवारांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबीयाची घेतली भेट

आ. रोहित पवारांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबीयाची घेतली भेट

May 13, 2026
तीन गावातील २१ वाड्यावस्त्यांना तिन टँकर सुरु

तीन गावातील २१ वाड्यावस्त्यांना तिन टँकर सुरु

May 13, 2026
श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रोत्सस गुरुवारपासून प्रारंभ

श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रोत्सस गुरुवारपासून प्रारंभ

May 13, 2026

विद्या विकास मंदिरचा निकाल ९८.४३ टक्के; वैष्णवी कानगुडे प्रथम

May 13, 2026
ए. जी. पाटील टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा आविष्कार

ए. जी. पाटील टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा आविष्कार

May 13, 2026
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचां वासंतिक शिबीराचे उद्घाटन

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचां वासंतिक शिबीराचे उद्घाटन

May 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0861319

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697