अकलूज – दि 6 जुलैला माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतमजुरी उषा साठे यांची हत्या झालेच्या निषेधार्थ आज बुधवार दि.15 रोजी योद्धा प्रतिष्ठानने पुकारलेल्या अकलुज बंदला प्रतिसाद देत,दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला.यावेळी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
उषा साठे हत्या प्रकरणी पुकारलेला बंदला अकलूजमधील दैनदिन व्यवहार दुपारपर्यंत बंद होते.
सकाळी १० वाजता डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते प्रांत कार्यालया पर्यंत काढलेल्या निषेध मोर्चात सर्व पक्ष व सर्व सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.प्रांत कार्यालय येथे निषेध सभा घेवुन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवुन पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या1) गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल ज्याच्या नावावर आहे त्यास सह आरोपी करावे.२) सदर केस तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी.३) त्या नराधम आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.४) पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत करून पुनर्वसन करावे अशा मागण्या करण्यात आल्या.मोर्चा समाप्ती नंतर बंदला पाठींबा दिल्या बद्दल योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने शेखर खिलारे यांनी अकलूज करांचे नतमस्तक होवुन आभार मानले व दुपारनंतर सर्व व्यवहार सूरळीत चालु ठेवण्यात यावे असे अहवान केले.
Post Views: 4