सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र शासन, सोलापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय पुरस्कृत एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 25हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत अर्णव पापरकर, मधवीन कामथ, दक्षिणेश्वर सुरेश, सिद्धार्थ रावत या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
येथील एमएसएलटीए टेनिस कोर्ट, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत एकेरीत अमेरिकेच्या अधित्य गणेशन याने पाचव्या मानांकित ट्युनिशियाच्या अझीझ औका चा 6-4, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला
अर्णव पापरकर याने चिराग दुहानवर 7-5, 7-6(4) असा विजय मिळवला. मधवीन कामथ याने उदित कंबोज चा 6-3, 6-2 असा सरळ सेट मध्ये पराभव केला. सातव्या मानांकित भारताच्या सिद्धार्थ रावतने कझाकस्तानच्या ग्रिगोरी लोमाकिन चा 6-4, 6-7(3), 6-1 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. अव्वल मानांकित दक्षिणेश्वर सुरेश याने देव जावियाचे आव्हान 5-7, 6-2, 7-6(6) असे संपुष्टात आणले.
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: पुरुष गट:
पावित सोर्नलॅक्सप(थायलंड)वि.वि.काहीर वारिक (भारत)6-2, 7-5;
एस डी प्रज्वल देव(भारत)[8] वि.वि. नोहा शॅचर (अमेरिका)6-2, 6-2;
समीर बॅनर्जी (अमेरिका)[6]वि.वि.मनीष सुरेशकुमार (भारत)6-1, 6-2;
दुहेरी:
अनुप बांगर्गी (भारत)/अर्णव पापरकर (भारत) वि.वि.प्रणव कार्तिक (भारत)/अर्जुन राठी (भारत)7-5, 6-2;
आदिल कल्याणपूर (भारत)[2] /र्युकी मत्सुदा(जपान)वि.वि.आदित्य बलसेकर (भारत)/ रोहन मेहरा (भारत)6-3, 6-7(5), 10-3;
दिग्विजय प्रताप सिंग (भारत)/ जगमीत सिंग (भारत)वि.वि. कबीर हंस (भारत)/मान केशरवानी (भारत) 7-5, 6-3;
थानापत चनता(थायलंड)/पवीत सोर्नलकसुप (थायलंड)वि.वि. राघव जयसिंघानी (भारत)/आराध्या क्षितिज (भारत)6-3, 6-4.