सोलापूर : “तेरे बाप को जैसे तडीपार किया अब तेरे को करता ” असे म्हणत एका तरुणाला लोखंडी रॉड आणि फायबर पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना सात रस्ता परिसरातील सुरभी हॉटेल जवळ रविवारी दुपारी घडली . दरम्यान याप्रकरणी चार जणांविरुद्ध सदर बाजारपुरीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सुनील चौधरी, धनंजय पंतुवाले, अक्षय पंतूवाले आणि गणेश मौलावाले (सर्व रा. महाराणा प्रताप झोपडपट्टी ,सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत गणेश राम जमादार (वय २४, रा. २७, महाराणा प्रताप झोपडपट्टी, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी हा रविवारी, २१ जूनला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुरभी हॉटेलसमोर थांबला असताना वरील आरोपी सुनील चौधरी याने हातातील लोखंडी रॉडने गणेशच्या डाव्या हाताच्या दंडावर, तर धनंजय पंतुवाले याने डाव्या पायाच्या गुडघ्यावर गंभीर मारहाण केली. तसेच अक्षय पंतुवाले आणि गणेश मौलावाले यांनी फायबरच्या पाईपने फिर्यादीला मारहाण करून तू आर के ग्रुपके नाद को लागता क्या ?’ , “तेरे बाप को जैसे तडीपार किया अब तेरे को करता ” ‘और तेरे को खलास करता’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार राहुल मनोहर हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 5