बार्शी – लग्नाचे निमंत्रण न दिल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केल्याची घटना बार्शी शहरातील मल्लप्पा धनशेट्टी रोड परिसरातील वडर गल्ली येथे घडली. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुरज पवार यांच्या फिर्यादीवरुन निलेश मंगळवेढकर व शारदा मंगळवेढकर यांच्याविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी सुरज सुनील पवार (वय ३२, रा. वडर गल्ली, बार्शी) यांच्या नातेवाईकांच्या मुलीचे लग्न दि. ३१ जुलै रोजी बार्शी येथील आदर्श मंगल कार्यालयात झाले होते. या लग्नाचे निमंत्रण काही नातेवाईकांना देण्यात आले नसल्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, २ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ते घरी जात होते. घरासमोर पोहोचल्यानंतर निलेश राजेंद्र मंगळवेढकर व शारदा राजेंद्र मंगळवेढकर (दोघे रा. वडर गल्ली, बार्शी) हे तेथे आले व त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेवेळी अरुणा जाधव, संगिता जाधव व सोनाली जाधव यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
Post Views: 32