बार्शी – कुसळंब रोडवरील जामगांव बायपास परिसरात दुचाकीस्वाराने भरधाव वेगात टेम्पोला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक दिली. या अपघातात एसटी बस व दुचाकीचे नुकसान झाले असून, याप्रकरणी एसटी बस चालकाने दुचाकीस्वाराविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुंजा नारायण सुरवसे (वय ५२, रा. हिवरा गोवर्धन, जि. बीड) हे ३ ऑगस्ट रोजी ते एसटी बस क्रमांक एमएच २० बीएल २५५७ घेऊन पंढरपूरहून माजलगावकडे जात होते. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही बस बार्शी-कुसळंब रोडवरील जामगांव बायपासच्या पुढे मौजे जामगांव शिवारातील आली असता समोरुन एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने येत होता. संबंधित दुचाकीस्वाराने पुढे जाणाऱ्या टेम्पोला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नातून एसटी बसच्या समोरील उजव्या बाजूच्या बंपरला धडकली. या अपघातात दोन्ही वाहनाचे २५ हजारांचे नुकसान झाले. निनाद परमेश्वर गोडसे (रा. पांगरी, ता. बार्शी) धडक दिलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
Post Views: 62