सांगोला – नाझरे पंचक्रोशीतील वझरे, अनकढाळ, चोपडी, बलवडी, सरगरवाडी, राजुरी, चिनके या भागातील नागरिकांना सोलापूर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे शासकीय कामासाठी, जिल्हा परिषद व कोर्ट कामासाठी, विद्यार्थीना विद्यापीठ येथे जाण्यासाठी व रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल येथे सकाळी लवकर जाण्यासाठी डायरेक्ट बस नसल्याने गैरसोय होत होती. तसेच या भागातील भाविकांना पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर येथे देव दर्शनाला जाण्याच्या दृष्टीने या भागातून सोलापूर बस सेवा असावी अशी मागणी प्रवासी सेवा संघाच्या वतीने होत होती.
सदर मागणी लक्षात घेऊन आटपाडी येथून गाणगापूर बस सेवा सुरु सोमवार पासून सुरू करण्यात आली आहे. सोमवार दि.६ एप्रिल पासून आटपाडी येथून स.६.३० वा. नाझरे येथून ७ वा. सांगोला येथून ७.३० वा. सुटून ती गाणगापूर येथे दु.१.३० वा. पोहचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी गाणगापूर येथून दु.२.३० वा. ही बस सुटणार आहे. ही बस आटपाडी व सांगोला या मार्गांवरील सर्व थांबे घेणार असल्यामुळे ग्रामीण विभागातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
सदरची बससेवा सुरु करण्यासाठी संजय पाटील, कुमार नरखडे, तातोबा वाघमारे, बंडगर, अमोल गोंजारी, परशुराम नकाते, श्रीपाद पोतदार, विकास पोफळे यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे या भागातील प्रवाशांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.




















