सोलापूर : स्वातंत्र्यसैनिकांच्या संस्कारातून घडलेले बी. टी. (भालचंद्र) जोशी यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि माणुसकीच्या बळावर समाजासमोर आदर्श निर्माण केला, असे गौरवोद्गार कवी देवेंद्र औटी यांनी काढले.
बी. टी. जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. विलास जहागीरदार, डी. टी. जोशी, ज्येष्ठ विचारवंत रविंद्र नायडू, शरद अकतनाळ यांच्यासह पुणे व सोलापूर येथील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
औटी म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटलमधील सेवाकाळात बी. टी. जोशी यांनी नियमबद्ध, पारदर्शक आणि नैतिक मूल्यांवर आधारित कार्यपद्धतीचा आदर्श घालून दिला. आजच्या मूल्यहीन वातावरणात त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.यावेळी बी. टी. जोशी यांची ग्रंथतुला करण्यात आली. श्रीपाद व वल्लभ जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत, तर डी. टी. जोशी यांनी आभार मानले.
Post Views: 30