करकंब – जि.प.प्रा.शाळा जळोली ता.पंढरपूर येथील शिक्षक बाळू खांडेकर यांना आदर्श शिक्षक तसेच त्यांच्या पत्नी कविता खांडेकर यांना राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.चिखली बुलढाणा येथील बहुजन सेवासंघ यांचेवतीने राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.त्यावेळी जि.प.प्रा.शाळा जळोली येथील बाळू खांडेकर यांचा शाळेमध्ये विविध प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून विविध साहित्य मिळवून देणे,विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे या शैक्षणिक कार्याबद्दल तसेच त्यांच्या पत्नी कविता खांडेकर यांना शेतीविषयक कार्याबद्दल शेतकरी पुरस्काराने नागेश शिंगण यांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये त्यांनी एकरी ११० टन ऊस उत्पादन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीत चांगली भरारी घेतल्यामुळे त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी जळोली येथील पदाधिकारी जोतीराम मदने,तानाजी नरसाळे,दत्तात्रय किर्ते,धर्मा नवगिरे,कान्हापूरी सरपंच कोमल शिंदे,प्रशालेचे मुख्याध्यापक जयवंत कापसे,शिक्षक नागनाथ गायकवाड, कैलास नरसाळे,ज्ञानेश्वर दुधाणे, शिक्षिका देवकी कलढोणे -दुधाणे आदी उपस्थित होते.यावैळी विविध क्षेत्रातील मान्यवर,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 5