मार्च 2027 पर्यंत मागील वर्षापेक्षा जास्त थककर्ज वसुली करु असे आश्वासन दिले. तसेच बँकेबाबत काही लोक सोशल मिडियाच्या माध्यमातुन बदनामीकारक मजकुर प्रसिध्द करीत आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवु नये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे निर्देशाप्रमाणे बँकेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी कामकाज करीत आहेत. सभासदांनी बँकेवर ठेवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे. कोरोना काळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी वेळ गेला परंतु मागील दोन वर्षात जवळपास 30 कोटी वसुल झाला आहे, असे सांगितले.
बँकेचे संचालक राजेंद्रकुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले. वरीष्ठ अधिकारी दयासागर देशमाने यांनी अहवाल वाचन केले. बँकेचे व्हा. चेअरमन महादेव माळी, संचालक अजिम शेख, संतोष बुरकुल, मुझफ्फर काझी, नागेश राऊत, किरण क्षिरसागर, तज्ञ संचालक उदयसिंग राजपुत, सौ. अश्विनी शहा व चंदाराणी कोंडुभैरी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर ब्रम्हे, प्रशासन विभाग प्रमुख दत्तात्रय शिर्के तसेच अधिकारी वर्ग, कर्मचारी व सभासद उपस्थित होते. संचालक श्री. राजेंद्रकुमार जाधव यांनी सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले.






















