माळशिरस …. भांडेवस्ती (गारवाड)एस टी माळशिरस बस स्थानकात कायम उशीर होत असल्याने विद्यार्थ्यासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज तर १ वाजून ३० मिनिटाची बस ३ वाजून ३० मिनिटांनी आली सुमारे दोन तास उशिरा आली . बस वेळेवर सोडण्याची मागणी विद्यार्थी ,पालकासह नागरीकातून होत आहे .
माळशिरस शहरामध्ये कन्या प्रशाला,गोपाळराव देव प्रशाला,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विदयालय ,माळशिरस प्रशाला ,श्रीनाथ विद्यालय अश्या पाच शाळा असून या शाळेत गोरडवाडी,गारवाड,भांडेवस्ती या भागातून असंख्य मुले.मुली शाळेत येत असतात.शाळा सकाळी सात वाजता असल्याने विद्यार्थी सहाच्या बसने येतात काही शाळा साडे अकरा,काही बारा वाजता सुटतात हे विद्यार्थी एक वाजून तिस मिनिटांनी असणाऱ्या भांडेवस्ती गाडीतून घरी जातात .या मुलांना सकाळी सहाच्या बस मध्ये येण्यासाठी लवकर उठून ,निघावे लागते परंतु शाळा सुटल्यानंतर बस वेळेवर येत नसल्याने घरी जाण्यास उशीर होतो,विद्यार्थी लहान असल्याने पालक घरी काळजी करीत बसतात,विद्यार्थी बस स्थानकात वाहतूक नियंत्रक यांना विचारतात बस कधी येईल .विद्यार्थ्यांना तासनतास बसची वाट पाहत बसावे लागत आहे.विद्यार्थी अक्षरशः पेकाळून जातात.उशिरा आलेल्या बसने घरी जाणार कधी ,शिक्षकांनी दिलेला गृह्पाट करणार कधी व झोपणार कधी हा प्रश्न निर्माण झाला आहे.शासन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सवलती देते,मग योग्य सेवा कधी देणार हा प्रश्न पालाकातून विचारला जात आहे.
मस्के ,वाहतूक निरीक्षक,अकलूज
आगारात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने बस सोडण्यास विलंब होत आहे.
जयसिंग काळे ..वाहतूक नियंत्रक माळशिरस बस स्थानक
विद्यार्थी १२ वाजल्या पासून बसून असतात भांडेवस्ती बस ची वेळ १ वाजून ३० मिनिटे आहे परंतु अकलूज आगारातून उशिरा येत आहे .
निशा यमगर ,गोरडवाडी,विद्यार्थिनी
आम्ही शाळेसाठी सकाळी सहा वाजता शाळेसाठी निघतो .शाळा सुटून बस वेळेवर येत नसल्याने घरी जाण्यास उशीर होतो .अभ्यास असतो,.घरी आई वडील काळजी करीत बसतात ,बस वेळेवर यावी
Post Views: 9