Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चिंचोळी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहास प्रारंभ; उद्योगांमधील विद्युत अपघात रोखण्यासाठी जनजागृती व सुरक्षिततेवर भर Inbox

तरुण भारतbyतरुण भारत
June 28, 2026
in west maharashtra
0
चिंचोळी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहास प्रारंभ; उद्योगांमधील विद्युत अपघात रोखण्यासाठी जनजागृती व सुरक्षिततेवर भर Inbox
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन आणि विद्युत निरीक्षक कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जून ते २ जुलै या कालावधीत देशभर साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ शनिवारी (दि. २७) चिंचोळी औद्योगिक वसाहतीतील सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात उत्साहात करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत गांगुर्डे होते. प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे तसेच चिंचोळी एमआयडीसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश अंभोरे उपस्थित होते. यावेळी विद्युत निरीक्षक वर्षा सुतार, शाखा अभियंता भारती चव्हाण, नवाब मनुरे तसेच असोसिएशनचे कार्यकारी सदस्य कमलेश शहा, रामेश्वरी गायकवाड यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्युत निरीक्षक वर्षा सुतार यांनी उद्योगांमधील विद्युत सुरक्षेच्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आरसीसीबी (RCCB) उपकरणांचे महत्त्व, विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची आवश्यक दक्षता, विद्युत यंत्रणांची नियमित तपासणी व देखभाल, कंट्रोल पॅनेलसमोर इन्सुलेटेड अर्थ मॅटचा वापर, २५० किलोवॅटपेक्षा अधिक भार असलेल्या उद्योगांनी विद्युत सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची आवश्यकता, कार्यक्षम अर्थिंग व्यवस्था, सुरक्षित व मानकांनुसार वीज संच मांडणी तसेच वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) योग्य वापर याविषयी सखोल माहिती दिली.

यावेळी अधीक्षक अभियंता हेमंत गांगुर्डे यांनी राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्युत निरीक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमेमुळे उद्योगांमध्ये सुरक्षित कार्यपद्धती विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे यांनी आपल्या मनोगतात असोसिएशन उद्योगांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सुरक्षित, शाश्वत व जबाबदार औद्योगिक कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, भविष्यातही अशा उपयुक्त जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे व्यवस्थापक शुद्धोधन गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवाब मनुरे यांनी केले.

विद्युत सुरक्षा सप्ताहात खालील बाबींवर विशेष भर

* ईएलसीबी (ELCB) / आरसीसीबी (RCCB) बसविण्याचे महत्त्व
* कार्यक्षम अर्थिंग प्रणालीची आवश्यकता
* तीन-पिन सॉकेटचा सुरक्षित वापर
* जुनी व दोषपूर्ण वायरिंगमुळे उद्भवणारे धोके
* मुलांच्या सुरक्षित लिफ्ट वापराबाबत जनजागृती
* लिफ्टमधील ओव्हरलोडिंग टाळणे तसेच एमआरडी (MRD) व इंटरलॉक प्रणालीची माहिती
* विद्युत व उद्वाहन (Lift) संबंधीची सर्व कामे केवळ अधिकृत व पात्र ठेकेदारांकडूनच करून घेण्याचे आवाहन

Post Views: 34
Previous Post

एमएस-सीआयटीला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान

Next Post

भांडेवस्ती एस.टी.दोनतास लेट,विद्यार्थ्यासह नागरिकांना नाहक त्रास

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भांडेवस्ती एस.टी.दोनतास लेट,विद्यार्थ्यासह नागरिकांना नाहक त्रास

ताज्या बातम्या

शेकापच्या राज्य सोशल मिडीया कोअर कमेटीवर सरतापे, बंडगर यांची निवड

शेकापच्या राज्य सोशल मिडीया कोअर कमेटीवर सरतापे, बंडगर यांची निवड

July 16, 2026

महापालिकेच्या कामकाजावर खा. प्रणिती शिंदे यांची तीव्र नाराजी 

July 16, 2026

एक पेड माँ के नाम’ आणि राज्याच्या ३० कोटी वृक्षलागवड मोहिमेला सहकार क्षेत्राची साथ; दिलीप पतंगे यांचे आवाहन

July 16, 2026
प्रत्येक घरातुन भाकरी,पोळ्या जमा करत ४० वर्षापासुन अविरतपणे अन्नदानाचा उपक्रम

प्रत्येक घरातुन भाकरी,पोळ्या जमा करत ४० वर्षापासुन अविरतपणे अन्नदानाचा उपक्रम

July 16, 2026

इंडियन रेल्वे केटरिंगIRCTC टुरिझम कार्पोरेशनने सुरु केली नवीन वेबसाईटची बीटा आवृत्ती #viral

July 16, 2026

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा धर्मादाय संस्थांना पुढे येण्याचे आवाहन #solapurnews

July 16, 2026

धनंजय मुंढे मंत्री व्हावे म्हणून केली लाडूंची तुला #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

July 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0979651

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!