टेंभुर्णी – विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.
2 करकंब या कारखान्याचे सन 2025-26 गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसाचा दिवाळीसणासाठी अंतिम हप्ता प्रति टन रू.100/-प्रमाणे सभासद,बिगरसभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांचे बँक खात्यात जमा करणेत आला असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष मा.आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना मा.आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.
2 करकंब या कारखान्याचा सन 2025-26 गळीत हंगाम बंद झालेला असून या हंगामात युनिट नं.1 कडे 15 लाख 54 हजार 562 मे.टन गाळप होवून 10 लाख 33 हजार 900 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. तसेच युनिट नं.2 कडे 5 लाख 24 हजार 451 मे.टन गाळप होवून 4 लाख 86 हजार 150 असे एकूण 20 लाख 79 हजार 013 मे.टन ऊसाचे गाळप होवून 15 लाख 20 हजार 050 क्विंटल साखर पोती उत्पादीत झाली आहेत.
सन 2025-26 गळीत हंगामामध्ये दोन्ही युनिट कडे गाळपास आलेल्या ऊसास यापुर्वी प्रति मे.टन रू.3025/- प्रमाणे पहीला हप्ता अदा केला आहे. या हंगामात गाळपास आलेल्या ऊसासाठी दिवाळीकरीता अंतिम हप्ता प्रति टन रू.100/-प्रमाणे ऊस पुरवठादार शेतक-यांचे बँक खात्यात जमा करणेत आला असून सन 2025-26 हंगामासाठी एकूण ऊस दर प्रति टन रू.3125/-होत असून जिल्ह्यात उच्चांकी दर ठरला आहे. प्रति टन रू.100/-प्रमाणे बिलासाठी एकूण रू.20 कोटी 79 लाख अदा करणेत आले आहेत.
कारखान्याचा सन 2026-27 गळीत हंगाम सुरू असून कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतूक करणा-या व ऊस पुरवठादार शेतक-यांनी आपला सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दोन्ही युनिटकडे गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन आ.बबनराव शिंदे यांनी केले.
सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपट गायकवाड, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व इतर अधिकारी उपस्थित होते.
Post Views: 13