Monday, September 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’ देशभरातील युवकांना एकत्र आणणारा दुवा ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण भारतbyतरुण भारत
August 13, 2026
in mumbai
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रातील तसेच देशभरातील युवकांना क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’ या तीन दिवसीय भव्य युवा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.देशभरातील युवकांना एकत्र आणणारा हा दुवा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

तीन दिवसांच्या महोत्सवात सुमारे एक हजार प्रतिनिधींचा सहभाग

पुण्यातील बालेवाडी स्पोर्ट कॉम्पेक्स येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील युवा संमेलनात देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून युवकांचा सहभाग राहणार आहे. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून सुमारे 30 ते 35 प्रतिनिधी सहभागी होण्याचे नियोजन असून एकूण सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होतील. यामध्ये महाराष्ट्राचे 300 प्रतिनिधी, तर इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून 700 प्रतिनिधी सहभागी होतील. तीन दिवसांच्या या महोत्सवाला राज्यभरातील एक लाखांहून अधिक युवकांचा फूटफॉल असण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.

            विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026 हा भारताच्या युवा शक्तीला क्रीडा, नवोन्मेष आणि संस्कृतीच्या माध्यमातून एकत्र आणणारा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम म्हणून प्रस्तावित आहे. यातून युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, नवोन्मेष व उद्योजकतेला चालना देणे, देशाची सांस्कृतिक विविधता साजरी करणे, आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            या युवा संमेलनाची संकल्पना ‘वॉरिअर, फ्युचर आणि कल्चरल असा तीन अनुभव क्षेत्रांमध्ये करण्यात यावी. या तीनही क्षेत्रांमधून युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता, संस्कृती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. यापैकी वॉरिअर झोनमध्ये युवकांमध्ये सामर्थ्य, शिस्त आणि धैर्य विकसित करण्यावर भर देण्यात यावा.  स्वसंरक्षण कार्यशाळा, क्रीडा विज्ञान, पोषण, क्रीडा मानसशास्त्र यासह विविध क्रीडा उपक्रम आयोजित करावा. आर्मी ऑब्स्टॅकल कोर्स, वॉल क्लायम्बिंग, रिअॅक्शन टाइम अरेना आणि फिटनेस असे अनुभवाधारित उपक्रमही यात असावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            पुणे हे तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने ‘फ्युचर झोन’मध्ये युवकांच्या तंत्रज्ञानविषयक क्षमतांना प्रोत्साहन देण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना करत ‘कल्चरल झोन’मध्ये सर्जनशीलता, आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा यांचा संगम घडावे. महाराष्ट्रातील लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, चित्रकला, छायाचित्रण आदी कलाप्रकारांसाठी स्पर्धा आणि उपक्रम आयोजित करावे. त्याचबरोबर, योग, ध्यान, मानसिक आरोग्य, श्वसनाचे व्यायाम यांसारख्या उपक्रमांसोबतच स्थानिक हस्तकला, वारली व पैठणी कला, पारंपरिक महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती आणि शाश्वत जीवनशैली यांचीही माहिती युवकांना करून देण्यात यावी, असे निर्देश दिले.या महोत्सवासाठी पूर्णपणे डिजिटल नोंदणी विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

            ऑनलाइन नोंदणी, राज्यनिहाय नामनिर्देशन, कागदपत्र पडताळणी, क्युआर कोड आधारित डिजिटल ओळखपत्र, मोबाईल कार्यक्रम मार्गदर्शक आणि थेट सूचना अशी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. त्यामुळे सहभागी युवकांची नोंदणी, प्रवेश आणि विविध उपक्रमांतील सहभाग याचे प्रभावी व्यवस्थापन करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रात खासगी सहभाग वाढविण्यावर भर

            ‘खेलो इंडिया’अंतर्गत केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्याने महाराष्ट्राने केंद्राच्या योजनांमध्ये प्रभावी सहभाग घेण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रात खासगी क्षेत्राची गुंतवणूक आणि सार्वजनिक खाजगी भागीदारीवर भर देण्याबरोबर क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील क्रीडा फाउंडेशनशी समन्वय साधण्याबाबत चर्चा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. महाराष्ट्राला आगामी दशकात क्रीडा क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी शासकीय प्रयत्नांसोबतच खासगी क्षेत्राची भागीदारी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

००००

Post Views: 58
Previous Post

किरकोळ भांडणातून बिहारी मित्राचा झोपेत असताना हातोडीने मारून खून 

Next Post

खतांच्या ‘लिंकिंग’विरोधात कठोर कारवाई करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

खतांच्या ‘लिंकिंग’विरोधात कठोर कारवाई करा - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

ताज्या बातम्या

मुख्यमंत्रीही म्हणाले काळजी घ्यावी लागेल #viral #news #marathinews#maharshtranews #cmo

September 28, 2026

हे सांगतात तज्ञ अलनिनोबाबत #viral #news #newsupdate #latestnews

September 28, 2026

सावकारी पाश सरकार आवळणार #viral #news #marathinews #latestnews

September 28, 2026

पारंपारिक पद्धतीत निघाली ताता गणपतीची मिरवणूक…

September 27, 2026

आप्पा गणपतीची निघाली दिमाखात मिरवणूक…

September 27, 2026

आचारसंहितेचा फटका भावी गुरुजींना? पवित्र पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण

September 27, 2026

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

September 27, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा आज पासून

September 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1270925

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!