माळशिरस – दुचाकीवरून पडून डोक्याला मार लागून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असून दुचाकी चालकांनी वाहन चालकांनी हेल्मेटचा वापरावे तसेच वाहतुकीच्या नियमाचे पालन केल्यास केल्यास अपघाताचे व मृत्यूचे प्रमाण कमी होते.
कमल फाउंडेशनने हेल्मेट वाटप करून स्तृत्य उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे यांनी गोरडवाडी येथील कमल फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्यावतीने हेल्मेट वाटप कार्यक्रम प्रसंगी सांगितले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. शिवेंद्र सिंह व अभयसिंह कर्णवर पाटील या मुलांच्या वाढदिवसानिमित्त व बिरोबा यात्रेनिमित्त कर्णवर परिवारातर्फे हेल्मेट वाटप व बाईक रॅली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त करून अनोख्या उपक्रमाची प्रशंसा केली. महिलांना व पुरुषांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे, माळशिरस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास दिंडूरे,नूतन डी वाय एस पी प्रदीप गोरड, मोटार वाहन निरीक्षक अमोल घुले सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्रीमती सुषमा गुणवरे, पंचायत समितीचे नूतन सभापती दत्ता भैया मगर, सेवा निवृत्त अभियंता धनंजय पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अंगरक्षक अँड राहुल वाघमोडे, आदिवासी धनगर समिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले, नाशिकचे बापूसाहेब शिंदे, अमरावतीचे ज्ञानेश्वर डुमणे, आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला . यावेळी श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील,ठाणे शहर क्राईम ब्रँच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील, कमल फाउंडेशनच्या अध्यक्ष अमोल कर्णवर पाटील ,शामराव कर्णवर पाटील अजित कर्णवर पाटील ,धुळदेव कर्णवर पाटील, कांतीलाल कर्णावर पाटील, सचिन कर्णवर पाटील, शिवाजी कर्नवर पाटील व कर्णवर पाटील परिवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


















