
या घटनेची हकीकत अशी,तालुक्यातील शासकीय धान्य दुकानाचा माल सोलापूर येथून थेट शासकीय धान्य गोडाऊन मध्ये उतरला जातो. तेथे 50 किलोच्या बॅगा करताना जवळपास 3 किलो काटामारी गेल्या अनेक दिवसापासून सुरु होती. दि.15 मे रोजी दुपारी 1 वाजता शासकीय गोडाऊन मधून एम.एच.04 एच.डी.0615 हा मालाचा टेंपो किल्ला भाग येथील बृहत विकास सोसायटी धान्य दुकान येथे माथाडी कामगार हमाल म्हणून नव्हते तर ते तोतया हमाल असल्याचे दिसून आले. सदरच्या टेंपो माल घेवून आला होता. यावेळी मनसेचे नारायण गोवे यांनी थेट पुरवठा निरीक्षक जयंत कुलकर्णी यांना कॉल करुन गाडीतील माल तपासणी करण्याची मागणी केल्यावर पुरवठा निरीक्षक घटनास्थळी आले.त्यांनी तपासणी करते प्रसंगी प्रत्येक गोणी मागे दोन ते अडीच किलो कमी असल्याचे प्रत्यक्ष पडताळणीत दिसून आले आहे.
यापुर्वी शासकीय गोडाऊन येथे स्वस्तधान्य दुकानदारांकडून मंथली घेणार्या एक खाजगी इसम व तत्कालीन पुरवठा निरीक्षक यांच्यावर लाचलुचपत विभागाने सापळा लावून कारवाई केली होती.























