अक्कलकोट – तालुक्यातील सुक्षेत्र नीलगार करजगी येथील श्रीमद रंभापुरी शाखा मठात पूज्य श्री रेणुका देवरू यांचा ‘श्री गुरु पठ्ठाधिकार महोत्सव ” अत्यंत उत्साहात संपन्न होत आहे. या महोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत ऍड दयानंद उंबरजे (अध्यक्ष, श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी व उद्योजक) यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी श्रीमद रंभापुरी जगद्गुरु डॉ. वीर सोमेश्वर राजदेशीकेंद्र शिवाचार्य भागवतपाद महाराज यांचे दिव्य सानिध्य आणि शुभाशीर्वाद लाभणार आहेत. त्यांच्याच मंगल उपस्थितीत गुरुवार, दिनांक २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता भव्य ‘धर्मसभा’ पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत, ज्यात प्रामुख्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी, करजगी चे सरपंच विवेकानंद उंबरजे, आयोजक श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड दयानंद उंबरजे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवशरण जोजन, अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्य पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी ७:०० वाजल्यापासून मंगलमय कुंभ-कलश मिरवणूक, धार्मिक विधी, आणि मस्तक अभिषेक सोहळा पार पडेल. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ५:३० वाजता धार्मिक सभा व प्रवचन महामंगल संपन्न होईल.
या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी व नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक ऍड दयानंद उंबरजे व समस्त करजगी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी करजगी, आहेरवाडी, बंकलगी, कुंभारी आणि अर्जुनगी परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केला आहे.
Post Views: 8