सांगोला – सांगोला महाविद्यालय येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने इमर्टिकस लर्निंग, पुणे यांच्या माध्यमातून ऍक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांच्यासाठी कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करण्यात आला. याप्रसंगी इमर्टिकस लर्निंगचे वरिष्ठ व्यवस्थापक हेमंत जगताप, अक्षय मिसाळ उपस्थित होते. यावेळी हेमंत जगताप यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग व विमा क्षेत्रातील करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सूर्यकांत पाटील यांनी कॅम्पस ड्राइव्हचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे व करिअरसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. याच्या यशस्वीतेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ.राम पवार, संगणक विभागप्रमुख डॉ. राजकुमार ताठे, कार्यालयीन अधीक्षक विलास माने, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी चार विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष ता.ना.केदार, प्रा.पी.सी.झपके, सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, खजिनदार नागेश गुळमिरे यांनी आयोजकांचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.