सोलापूर -अज्ञात करण्यावरून एका 27 वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्ष्मीपेठ परिसरातील धुमावस्तीत शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
अविनाश आप्पाराव देवकुळे (वय 27 वर्ष, रा.धुम्मावस्ती,लक्ष्मीपेठ सोलापूर) असे मयताचे नाव आहे. घरात कोणी नसताना त्याने छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला . ही घटना घरच्यांना शनिवारी दुपारी निदर्शनास पडल्यावर त्याला फासातून सोडवून नातेवाईकांनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मयत अविनाश देवकुळे हा सेंट्रींगचे काम करीत होता.त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.तो विवाहित असून त्याची पत्नी चार वर्षांपूर्वी माहेरी गेली ती परतली नसल्याची माहिती नातेवाईकानी दिली.
Post Views: 21