सांगोला – विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजच्या रिक्त झालेल्या उपमुख्याध्यापक पदावर कोळा विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजचे पर्यवेक्षक चारूदत्त दिगंबर जगताप यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासो नरूटे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास चारूदत्त जगताप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या नियुक्तीबद्दल संंस्थेेचे उपाध्यक्ष ऍड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके यांनी चारूदत्त जगताप यांचे अभिनंदन केले
कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी घालून दिलेल्या विचारांच्या पाऊलखुणांवर चालत, सांगोला विद्यामंदिरचा नावलौकिक अधिक उंचावणे हेच माझे ध्येय आहे. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा क्षेत्रातील जिद्द प्रशासनात उतरवून शाळेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.
– चारूदत्त जगताप, नूतन उपमुख्याध्यापक

















