श्रीपूर – आयुष्यातील ३० ते ३५ वर्षाचा काळ नोकरी करत असताना कालबद्ध पणे पार पाडत प्रपंच तसेच मुलांचे संगोपन व त्यांना स्वतःचे पायावर उभे करण्यात पालकांनी व्यतीत केलेला असतो. मात्र सेवा निवृत्ती नंतर दैनंदिन जीवनतील चक्र बदलते . अशा प्रसंगी मुलांनी तो बोझ न समजता पालकांच्या आशा आकांक्षे कडे दातृत्व पूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी केले .
चंद्रशेखर विद्यालयाच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा अनिल जाधव यांच्या सेवानिवृत्ती समारंभात ते बोलत होते .
यावेळी मंचावर चंद्रशेखर विद्यालय तसेच अबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ . रामदास देशमुख , उपाध्यक्षा शुभांगी देशमुख , उद्योजक हिम्मतराव पाटील , डॉ . सुधीर पोफळे ,महाळुंग – श्रीपूर नगर पंचायतीचे सदस्य नानासाहेब मुंडफणे , शारदा नामदेव पाटील विक्रमसिंह लाटे , रतनसिंह रजपूत , प्रा .पांडुरंग बनसोडे, शाळेचे माजी प्राचार्य नागनाथ वाघमारे , मुख्याध्यापक शंकर यादव ,अनिल जाधव उपस्थित होते .
डॉ . रामदास देशमुख यांनी सुरेखा जाधव यांनी शालेय कारकिर्दीत शाळेचे नाव उज्चल केल्याचे सांगितले. याबरोबरच शुभांगी देशमुख , कोळेकरसर , प्रा . प्रकाश नवगिरे , डॉ . सुधीर पोफळे , संध्याताई कुलकर्णी यांनी आपल्या मनोगता मध्ये सुरेखा जाधव यांच्या शालेय उज्वल कार्याचा परिचय दिला .
तर सुरेखा जाधव यांनी चंद्रशेखर विद्यालयात ३७ वर्ष सेवाचा कालावधी पार पडत असताना ११ वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम करणेची संधी मिळाल्याचे सांगितले . सुत्रसंचलन आरती डोळे व पत्रकार दत्ता नाईकनवरे यांनी केले .

























