सोलापूर – अज्ञात कारणावरून दहावीतील एका सोळा वर्षीय मुलीने घरातील पत्र्याच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अक्कलकोट रोडवरील समाधान नगरात आज सोमवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली.
अक्षरा मारुती जाधव (वय 16 वर्ष, रा. समाधान नगर, अक्कलकोट रोड सोलापूर ) असे गळफास घेतलेल्या त्या मुलीचे नाव आहे. आज दुपारी अक्षरा याने घरामध्ये गळफास घेतला असल्याचे घरच्यांना आढळून आले. नातेवाईकांच्या साह्याने गळफास सोडवून अक्षराला भाऊ गोरख जाधव यांनी येथील शासकीय रुग्णालयात सव्वाचार वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मयत अक्षरा ही एस व्ही सी एस शाळेत इयत्ता दहावी मध्ये शिकण्यास होती. तिचे आई-वडील हे दोघेही वीट भट्टीवर कामाला जातात. आईने दहावीला असल्याने तू अभ्यास करत जा म्हणून ओरडले होते. या रागातुनच तिने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी बोलताना दिली.
Post Views: 3