
टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण सेवा जेष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठ ना पदोन्नती दिल्यास राज्यभर सेवा ज्येष्ठ शिक्षक कृती समिती आंदोलन छेडणार असल्याचे आमच्या बातमीदाराशी बोलत ना म्हणाले यावेळी जिल्हयातीलअन्यायग्रस्त सेवाज्येष्ठ शिक्षक वंचित पात्र मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी – गटातील पोपट थोरात पोपट पालवे प्रशांत सरुडकर प्रकाश राचेटी गुरु शांतप्पा मगी सिमिता कुंभार चंद्रकात स्वामी ज्ञानेश्वर मगर डॉ . राजेश्वरी कोरे धोंडप्पा रूपनुरे इत्यादी उपस्थित होते . पुढे बोलताना म्हणाले सिनियारटी कम मेरिट या तत्त्वानुसारच पदोन्नती प्रक्रिया राबवावी अन्यथा न्यायालयीन लढाईसह राज्यभर आंदोलन छेडले जाईल . असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण सीनियर शिक्षक कृती समितीने दिला आहे . राज्यात सुरू असलेल्या पदोन्नती प्रक्रियेत सेवा जेष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे गंभीर आरोप समितीने केले आहे काही जिल्ह्यांमध्ये अस्तित्वात नसलेल्या एक सप्टेंबर 2025 च्या कथेत शासन निर्णयाच्या आधार घेत पदोन्नती प्रक्रिया राबविली जात असल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे न्यायालयीन आदेश धाब्यावर बसून प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप समितीने केला आहे समितीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एस एल पी चा अंतिम निर्णय येईपर्यंत संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया स्थगिती ठेवण्याची मागणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येण्याआधीच घाईघाईने पदोन्नती प्रक्रिया राबविणे म्हणजे सेवा जेष्ठ शिक्षकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न आहे . असा आरोप संघटनेने केला आहे . उच्च न्यायलयच्या स्पष्ट आदेशानुसार डीपीसी बैठकीच्या तारखेला जे शिक्षक टीईटी / सीटीईटी उर्तीण असतील त्यांना पदोन्नतीस पात्र मानणे बंधनकारक असताना कृत्रिम कट ऑप लावून पात्र शिक्षकांना डावलले जात असल्याचा दावा समितीने केला आहे एक स्पटेंबर 2025 ही तारीख कुठून आणली ती कोणत्या वैध शासन निर्णयात आहे असा थेट सवाल संघटनेने उपस्थित केला आहे – विशेष म्हणजे सेवानिवृतीच्या ऊंबरठ्यावर असतानाही सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचा सन्मान राखत शिक्षक टीईटी / सीटीईटी परीक्षा उर्तीण केल्या आहेत काही शिक्षक पदोन्नती साठी परिक्षेला बसत आहेत कारण अता थोडया दिवसात सेवा निवृत होत आहेत मात्र अता त्यांना पदोन्नतीच्या हक्का पासून वंचित राहत आहेत अजून पर्यत निवड श्रेणी नाही अश्या अनेक समस्याने ग्रस्त आहेत त्यामुळे अनेक शिक्षका मध्ये असंतोष निर्माण झाला आहे . ज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठना पदोन्नती देण्याचा असा घाट घातला जात असेल तर आम्ही अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे एक ऑगस्ट 2019 चे शासन निर्णय नुसार पदोन्नती समितीच्या बैठका सप्टेंबर पूर्वी होणे अपेक्षित होते मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बैठका वेळेत झाल्या नाहीत आणि त्याचा फटका आता सेवा जेष्ठ शिक्षकांना बसत असल्याचे समितीचे म्हणणे आहे त्यामुळे सध्याच्या डीपीसी बैठकीच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपर्यंत पात्र ठरलेल्या शिक्षकाचा विचार करण्याचे न्याय ठरेल अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील नियम सहा ( 4 )चा दाखला देत सिनियर कम मेरिट हेच पदोन्नतीचे वैद्यता असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे गुणवत्ता आणि सेवा जेष्ठता यादी निकाषांवर पात्र ठरलेल्या शिक्षकांना प्राधान्य न दिल्यास शासनाविरोधात मोठा संघर्ष उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान या मागणीसाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि दादासाहेब भुसे यांची भेट घेतली मंत्र्यांनी मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवलाचे समितीने सांगितले आहे तसेच येत्या 22 मे रोजी पुणे येथे शिक्षण संचालकाची भेट घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे असे कृती समितीने कळविले आहे .
Post Views: 9